Use APKPure App
Get Janeev Calendar old version APK for Android
जाणीव पूर्वक सुरु असलेला प्रवास
जाणीव पूर्वक सुरु असलेला प्रवास
जाणीव फाउंडेशन हि आमची संस्था गेली सहा वर्ष रत्नागिरी मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील जि प शाळा दत्तक घेवून त्या विकसित करणे, रत्नागिरी तालुक्यामध्ये गाव दत्तक योजना राबविणे, ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन करणे. आरोग्यविषयक जनजागृती करणे, पर्यावरण विषयक उपक्रम राबविणे, रक्तदात्यांची जिल्ह्यातील पहिली ब्लड डोनर डिरेक्टरी आम्ही तयार केली आहे.
आम्ही अभिमानाने सांगतो आहे, आम्हाला जाणीव आहे या रत्नाभूमीची,या भूमिपुत्रांच्या सुख दुःखाची. या मातीचा सुवास आमच्या रक्तात भिनला आहे म्हणून हि जाणीव झाली आहे कि, कोकणची बुद्धिमत्ता दैदिप्यमान व्हावी, या निसर्ग संपन्न भूमीत, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण या सर्व क्षेत्रामध्ये खारीचा वाटा उचलणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे याची आम्हाला जाणीव आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जांभरुण गाव विविध सामाजिक उपक्रमांसाठी येत्या तीन वर्षाकरिता दत्तक घेतले आहे ते गाव सुजलाम सुफलाम करण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. यामध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये नदीतील गाळ उपसण्याचे काम तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आले त्यानंतर रत्याच्या दुतर्फा कातळामध्ये खड्डे मारून झाडे लावण्यात आली तसेच शालेय विद्यार्थ्यांची व अंगणवाडीतील मुलांची रक्तगट तपासणी करण्यात आली तसेच दीपावलीनिमित्त गावातील ग्रामस्थांना प्लास्टिक मुक्ती अभियानाअंतर्गत कापडी पिशवी वाटप, गणराया अवार्ड २०१७ या स्पर्धेचे बक्षीस वितरण, गावातील सर्व शाळांमधील विद्यार्थांना शालेय ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर तीनही अंगणवाडी प्ले स्कूल करण्याचे काम हाती घेतले आहे, त्यामध्ये जांभरून नं. ०१ हि अंगणवाडी चे लायनेस क्लब रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून आधुनिक प्ले स्कूल मध्ये रुपांतर करण्यात आले
Last updated on Jan 11, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Nécessite Android
4.1 and up
Catégories
Signaler
Janeev Calendar
1.0 by SoftLogic Innovate
Jan 11, 2018